शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले थेट नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 20:25 IST

चोरट्या मार्गाचीही पाहणी : अवैध वाळूवर नजर

जळगाव : गिरणा पदी पात्रातून होणारी बेसुमार अवैध वाळू वाहतूक पाहता याला लगाम घालण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे सोमवारी सायंकाळी थेट निमखेडी परिसरातील नदीपात्रात उतरले होते. त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी व तहसीलदार देखील होते. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी कोणत्या पात्रातून केव्हा वाळूचा उपसा होतो, कोणत्या मार्गावरुन त्याची वाहतूक होते. चोरटे मार्ग कोणते याची पाहणी करण्यासह नदीपात्रात काही जणांकडून माहीती जाणून घेतली. यावेळी रस्त्यात एक डंपर आढळून आले, ते जप्त करण्यात आले आहे.जिल्हाभरातील वाळू गटांचा लिलाव झालेला नाही. असे असतांनाही मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे अवैधपणे वाळू वाहतूक होत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात आली होती, त्यात वाहनांच्या तपासणीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूची वाहतूक करणारे डंपर पकडून चालक व मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला होता. अवैध वाळू वाहतुकीवर कायमचा आळा बसावा, महसूलात वाढ व्हावी, असे आदेशही नुकतेच विभागीय आयुक्तांकडून जिल्हाप्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अवैध वाळू वाहुकीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे काही तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या.या दोन्ही गोष्टींना अनुसरुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सोमवारी सायंकाळी साडे चार वाजता अचानकपणे गिरणा नदी परिसरातील खेडी, आव्हाणे तसेच निमखेडी या शिवारातील नदीपात्रात धडकले. यावेळी अधिकारी थेट नदीपात्रात उतरुन नेमकी कुठून व कशा पध्दतीने वाळू उपसा होतो. कोणत्या मार्गाने वाहने नदीपात्रात उतरतात व वाळू भरल्यानंतर कोणत्या चोरट्या मार्गांनी वाहतूक करतात याबाबत माहिती घेतली. यावेळी प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार नामदेव पाटील, तलाठी यांचीही उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांना नदीपात्रात काही डंपरही दिसून आले. मात्र त्यात वाळू नव्हती. याबाबत संबंधित पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव