जिल्हाधिका:यांकडे होणार हद्दवाढीच्या हरकतींची सुनावणी
By Admin | Updated: October 30, 2015 00:25 IST2015-10-30T00:25:45+5:302015-10-30T00:25:45+5:30
हद्दवाढीवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी घेण्यासाठी विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी मिसाळ यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आह़े त्यामुळे जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत़

जिल्हाधिका:यांकडे होणार हद्दवाढीच्या हरकतींची सुनावणी
धुळे : महानगरपालिकेच्या हद्दवाढीवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी घेण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आह़े त्यामुळे शहर हद्दवाढीवर दाखल हरकतींवर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत़ धुळे महापालिका अस्तित्त्वात आल्यापासून एकदाही हद्दवाढ न झाल्याने यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हद्दवाढीच्या हालचाली सुरू आहेत़ त्यानुसार 27 मार्चला जिल्हाधिका:यांमार्फत हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता, त्यावर कार्यवाही होऊन 10 जूनला राजपत्रात अधिसूचना जारी करून एक महिन्याच्या मुदतीत विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे हरकती मागविण्यात आल्या होत्या़ विहित मुदतीत मनपा, जि़प़सह एकूण 170 हरकती दाखल झाल्या आहेत़ मात्र जुलैमध्ये दाखल झालेल्या हरकतींवर ऑक्टोबर महिना उलटूनही सुनावणी घेण्यात आली नाही़ कुंभमेळ्याच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याने विलंब झाला होता़ मात्र त्यानंतरदेखील कार्यवाही न झाल्याने शासनाने विभागीय आयुक्तांना 29 सप्टेबर व 27 ऑक्टोबरला स्मरणपत्र देऊन हरकतींवर त्वरित सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांनाच शहर हद्दवाढीवर दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत़ सुनावणीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसून जिल्हाधिकारी लवकरच याबाबत निर्णय घेणार आहेत़ शहर हद्दवाढीत वलवाडी, भोकर, नगाव, बिलाडी, कुंडाणे, वरखेडी, बाळापूर, फागणे, वडजाई, पिंप्री, अवधान, लळींग, चितोड, महिंदळे, मोराणे व नकाणे या 16 गावांचा समावेश असून या गावांच्या एकूण 165़50 चौ़कि.मी़ क्षेत्रापैकी 103़88 चौ़कि.मी़ क्षेत्र समाविष्ट होणार आह़े शहर हद्दवाढीवर दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी ए़बी़मिसाळ यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आह़े त्यामुळे हद्दवाढीवर दाखल हरकतींची सुनावणी जिल्हाधिकारी घेतील़ -करुणा डहाळे सहायक संचालक, नगरपालिका प्रशासन, नाशिक शहर हद्दवाढीवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी घेण्याबाबत विभागीय आयुक्तांचे पत्र कालच प्राप्त झाले आह़े त्यामुळे पुढील काही दिवसात याबाबत कालावधी ठरवून हरकतींवर सुनावणी घेतली जाईल़ -अण्णासाहेब मिसाळ जिल्हाधिकारी, धुळे