भुसावळात इराणी वस्तीत कोम्बिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 13:32 IST2017-04-13T13:32:17+5:302017-04-13T13:32:17+5:30
भुसावळ शहरातील इराणी वस्तीत गुरुवारी पहाटे बाजारपेठ पोलिसांनी कोम्बिंग राबवल़े

भुसावळात इराणी वस्तीत कोम्बिंग
दुचाकी जप्त : अत्याचारातील अल्पवयीन संशयीत ताब्यात
जळगाव,दि.13-जिल्हाभरात सुरू असलेल्या सोनसाखळी लांबविण्याच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरातील इराणी वस्तीत गुरुवारी पहाटे बाजारपेठ पोलिसांनी कोम्बिंग राबवल़े कोम्बिंगमध्ये चार महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या अत्याचारावरील संशयीत अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. तर अन्य सहा इराणींना ताब्यात घेण्यात आल़े एक दुचाकीही जप्त करण्यात आली़ ही दुचाकी चोरीचा असल्याचा पोलिसांना संशय आह़े अन्य सहा इराणींपैकी एक रेकॉर्डवरील आरोपी असून सहा आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली़