शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

चाळीसगावला ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 15:30 IST

गेल्या तीन दिवसांपासून वातावरणासारखा बदल होत असून शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

ठळक मुद्देगारठा वाढला : शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन नाहीबिडगाव परिसरात पावसाची रिपरिप
लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : गेल्या तीन दिवसांपासून वातावरणासारखा बदल होत असून शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरणाची चादर आच्छादली गेली होती. गारठाही वाढला आहे. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही. अवकाळी पावसाचे संकट येते की काय? या धास्तीने शेतकरी मात्र चिंतातूर झाले आहे.चाळीसगाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. मध्यंतरी गायब झालेल्या थंडीने शनिवारी कमबॅक केले. दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने थंडगार वारे वाहत होते. अचानक थंडी आल्याने नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी असे लोकरीचे कपडे कपाटातून बाहेर काढले. दिवसभर थंडगार वारे वाहत असल्याने वर्दळीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत परिसरात कांदा लागवड सुरु आहे. गत महिन्यात लागवड झालेल्या रोपांसाठी ही थंडी फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.अवकाळी....नको रे देवा !यावर्षी परतीच्या पावसाने झोडपले. कोरोनाही परिक्षा घेतोच आहे. त्यात पुन्हा वातावरण बदलत असल्याने अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थिती पाणीसाठा मुबलक असल्याने रब्बी हंगामाला पोषक वातावरण आहे. मात्र अवकाळी पावसाने वर्दी दिल्यास रब्बी पेऱ्याला फटका बसू शकतो. दरम्यान शनिवारी दुपारी तीन वाजता काही भागात भुरभुर हलक्या सरीही कोसळल्या.ऐन हिवाळ्यात पावसाची रिपरिपऐन हिवाळ्यात बिडगाव (ता.चोपडा) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून त्याचा रब्बी पिकांना मोठा फटका बसणार असल्याने अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा होरपळला जाऊन आर्थिक संकटात सापडणार आहे. बिडगावसह परिसरातील मोहरद, वरगव्हान, देवगाव, पारगाव, लोणी, पंचक खर्डी, पुणगाव, मितावली आदी गावांना पावसाळ्यात अतिपावसाने झोडपून काढल्याने खरीपाचा हंगाम वाया गेला व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला.
टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाChalisgaonचाळीसगावRainपाऊस