मारहाणीनंतर आधार नोंदणी बंद
By Admin | Updated: September 30, 2015 00:17 IST2015-09-30T00:17:25+5:302015-09-30T00:17:25+5:30
जळगाव : 0 ते 5 वयोगटांतील बालकांच्या आधार नोंदणीसाठी नियुक्त असलेल्या आधार चालकांना त्रास होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना मंगळवारी देण्यात आले आहे.

मारहाणीनंतर आधार नोंदणी बंद
जळगाव : 0 ते 5 वयोगटांतील बालकांच्या आधार नोंदणीसाठी नियुक्त असलेल्या आधार चालकांना त्रास होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना मंगळवारी देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की 26 सप्टेंबरला मेहरूण परिसरात महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते आधार नोंदणी केंद्राचे उद्घाटन झाले. मात्र, कार्यक्रमानंतर परिसरातील पालकांनी याठिकाणी गोंधळ सुरू केला. तसेच या केंद्रातील ऑपरेटला मारहाण केली. या घटनेचा निषेध म्हणून 5 ऑक्टोबर्पयत आधार नोंदणी बंद ठेवण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी दिनेश जाधव, विकास पाटील, संजय खैरनार, तन्मय तायडे उपस्थित होते.