जळगावात मॉर्निग वॉक करीत असताना लिपिकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 2, 2017 11:32 IST2017-07-02T11:32:44+5:302017-07-02T11:32:44+5:30
पोलीस कवायत मैदानावर मॉर्निग वॉक करीत असताना प्रकाश नारायण वाघ (वय 55, मूळ रा.रानवड, ता.निफाड ह.मु.जळगाव) यांचा शनिवारी सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

जळगावात मॉर्निग वॉक करीत असताना लिपिकाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.2 - पोलीस कवायत मैदानावर मॉर्निग वॉक करीत असताना प्रकाश नारायण वाघ (वय 55, मूळ रा.रानवड, ता.निफाड ह.मु.जळगाव) यांचा शनिवारी सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मैदानावर चालत असताना वाघ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने उलटी होऊन ते बेशुद्ध पडले. पोलीस जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी आलेले डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी वाघ यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कमलेश भालचंद्र नगरकर यांच्या माहितीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकाश वाघ हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आस्थापना शाखेत मुख्य लिपिक होते.
19 जून रोजी ते नाशिक येथून जळगावला बदलून आले होते. नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात प}ी, 1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे.