मद्यधुंद बस चालकाची लिपिकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST2021-08-28T04:22:19+5:302021-08-28T04:22:19+5:30

पाचोरा : गोपनीय फाइल दाखवत नसल्याने बस चालकाने नशेत कार्यालयातील लिपिकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ...

Clerk beaten by drunken bus driver | मद्यधुंद बस चालकाची लिपिकाला मारहाण

मद्यधुंद बस चालकाची लिपिकाला मारहाण

पाचोरा : गोपनीय फाइल दाखवत नसल्याने बस चालकाने नशेत कार्यालयातील लिपिकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी पाचोरा आगारात घडली. आगार व्यवस्थापकांनाही शिवीगाळ करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा आगारात शुक्रवारी सकाळी वरिष्ठ लिपिक रवींद्र बळीराम पाटील यांच्या टेबलजवळ येत, बस चालक प्रदीप अंकुश पाटील याने गोपनीय फाइलची मागणी केली. त्यास लिपिकाने नकार देताच, प्रदीप याने त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेले वाहतूक नियंत्रक बाळासाहेब शेळके, कार्यशाळा अधीक्षक योगेश जाधव, वाहतूक अधीक्षक सागर फिरके यांनाही मारहाण व शिवीगाळ केली, तसेच आगर व्यवस्थापिका यांच्या नावाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यामुळे आगार कार्यालयात गोंधळ उडाला.

मारहाणीत दुखापत झालेल्या रवींद्र पाटील व बाळासाहेब पाटील यांच्यावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. आगार व्यवस्थापक नीलिमा बागुल यांनी झालेल्या प्रकाराबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Clerk beaten by drunken bus driver