जळगावात स्वच्छतेचा बोजवारा, साफसफाई होत नसल्याने नगरसेवकाचेच महापालिकेत आत्मक्लेष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:17 PM2020-02-28T12:17:26+5:302020-02-28T12:17:59+5:30

कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू राहणार

Cleanliness in Jalgaon, no cleanliness due to lack of sanitation | जळगावात स्वच्छतेचा बोजवारा, साफसफाई होत नसल्याने नगरसेवकाचेच महापालिकेत आत्मक्लेष आंदोलन

जळगावात स्वच्छतेचा बोजवारा, साफसफाई होत नसल्याने नगरसेवकाचेच महापालिकेत आत्मक्लेष आंदोलन

Next

जळगाव : गेल्या दहा दिवसांपासून सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद केल्यामुळे शहरात कचºयाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. वारंवार सांगूनही स्वच्छता होत नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी मनपाच्या आठव्या मजल्यावर आरोग्य विभागात आत्मक्लेष आंदोलन सुरू केले. स्वच्छतेसाठी नगरसेवकांना आंदोलन करावे लागत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मनपाने शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनासाठी वॉटरग्रेस कंपनीला एकमुस्त मक्ता दिला आहे. मात्र वेतन मिळत नसल्याने गेल्या दहा दिवसांपासून सफाई व कचरासंकलनाचे काम बंद केले आहे. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. शहरात सर्वत्र स्वच्छतेची विदारक परिस्थिती झाली आहे. ठिकठिकाणी कचरा साचला असून कचराकुंड्यादेखील ‘ओव्हरफ्लो’ झाल्या आहेत. नागरिक स्वच्छतेसाठी नगरसेवकांना वेठीस धरत आहेत. तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरात अस्वच्छता असून नागरिकांकडून प्रशासनावर नाराजी व्यक्त होवू लागली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी यांनी मनपात आत्मक्लेष आंदोलनाचा पवित्रा घेत त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
शहरातील स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाठी सकाळी जोशी हे मनपाच्या आठव्या मजल्यावरील आरोग्य विभागात आल्यानंतर त्यांनी कार्यालयाच्या बाहेर बसून हे आंदोलन सुरु केले. नगरसेवकच आंदोलन करीत असल्याने उपायुक्त मिनिनाथ दंडवते आणि आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी अधिकाºयांनी नगरसेवक जोशी यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र बंटी जोशी यांनी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले.
प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन
शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही परिस्थिती उद््भवली आहे. वारंवार सांगूनही कोणी ऐकत नाही. प्रभाग क्रमांक १२मध्येही स्वच्छतेचा बिकट प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आणि स्वच्छतेचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत दररोज आंदोलन करणार असल्याचे बंटी जोशी यांनी सांगितले.

Web Title: Cleanliness in Jalgaon, no cleanliness due to lack of sanitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव