साकेगावात अरुंद रस्त्यावरील काटेरी झुडपांची केली सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 16:38 IST2020-10-10T16:28:10+5:302020-10-10T16:38:46+5:30
साकेगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत रस्त्यावरील झुडपांची सफाई केली.

साकेगावात अरुंद रस्त्यावरील काटेरी झुडपांची केली सफाई
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे झुडपांमुळे रस्ता झाला खूपच अरुंद या मथळ्याखाली ‘लोकमत'ने १० रोजी वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायत प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत रस्त्यावरील झुडपांची सफाई केली.
नवीन वस्ती व गणपती नगर मार्गे सरळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीतून शाळेकडे जाणाºया मार्गाच्या प्रवेशावरच दोन्ही बाजूने काटेरी झुडपांनी वेढा घातला होता. यामुळे येथे चाललेदेखील कठीण झाले होते. विशेषत: गणपती नगर व नवीन वस्तीतील नागरिकांसाठी ही मोठी समस्या झाली होती. लोकमत'ने याबाबत १० रोजी वृत्त प्रसिद्ध करताच ग्राम पंचायत प्रशासनाने तत्काळ दखल घेत रस्त्यावरील काटेरी झुडपांची सफाई केली. प्रशासक सचिन बडगे ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सफाईच्या सूचना केल्या.