शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST2021-08-12T04:20:44+5:302021-08-12T04:20:44+5:30

शेंदुर्णी, ता. जामनेर - भारत सरकार युवा व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र आणि ग्लोबल यूथ फाउंडेशन यांच्या ...

Cleaning fortnight at Shendurni | शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवडा

शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवडा

शेंदुर्णी, ता. जामनेर - भारत सरकार युवा व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र आणि ग्लोबल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम सुरू आहे.

१५ ऑगस्टपर्यंत हा सेवाभावी उपक्रम चालणार आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातल्या लोकांना रोगराईच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. स्वयंसेवकांना शुभांगी वि. फासे यांनी स्वच्छतेची शपथ देऊन १ ऑगस्ट रोजी या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. रवींद्र बोरसे यांनी गावात स्वच्छता मोहिमेंतर्गत पोस्टर कॅम्पेन, जनजागृतीपर रॅली, निबंध स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांचे आगामी काळात आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर बोडके, रोहित माळी, यूथ क्लब मेंबर चेतन बारी, रितेश पाटील, अमृता बारी, अश्विनी सपकाळ, सेजल चव्हाण यांनी मेहनत घेतली.

यसोबतच नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावना युवक -युवतींमध्ये जागृत व्हाव्यात यासाठी जामनेर तालुक्यातील गावागावांतल्या तरुणांना नेहरू युवा केंद्राला जास्तीत जास्त उपक्रम व लोकहिताच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जोडले जात आहे. तालुक्यातील ज्या गावांतल्या तरुणांना सामाजिक कार्य करण्याची आवड आहे त्यांनी तालुका समन्वयकांशी संपर्क करावा, असे आवाहनही या अभियानादरम्यान करण्यात आले.

Web Title: Cleaning fortnight at Shendurni