खामखेडा येथील पुलावर केली ड्रेनेज पाइपची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:05+5:302021-09-04T04:21:05+5:30

मुक्ताईनगर : पूर्णा नदीवरील खामखेडा येथील पुलावर ड्रेनेज होल बुजले गेल्यामुळे पावसाचे पाणी अर्धा फुटापर्यंत पुलावर ...

Cleaning of drainage pipe on the bridge at Khamkheda | खामखेडा येथील पुलावर केली ड्रेनेज पाइपची साफसफाई

खामखेडा येथील पुलावर केली ड्रेनेज पाइपची साफसफाई

मुक्ताईनगर : पूर्णा नदीवरील खामखेडा येथील पुलावर ड्रेनेज होल बुजले गेल्यामुळे पावसाचे पाणी अर्धा फुटापर्यंत पुलावर थांबत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. ही बाब लक्षात घेता युवकांनी एकत्र येत ड्रेनेजची साफसफाई स्वत: केली. पावसाळ्यामध्ये कायमच या पुलावरील ड्रेनेज होल बंद होऊन पुलावर पाणी साचत असते. प्रशासनाच्या वेळ खाऊ वृत्तीचा फटका हा पुलावरून रहदारी करणाऱ्या प्रवाशांना बसतो. ही बाब लक्षात येताच ॲड. पवनराजे पाटील मित्रपरिवारातर्फे श्रमदान करून पुलावरच्या ब्लॉक झालेल्या ड्रेनेज पाइपवर साचलेली माती काढून पाण्याचा मार्ग मोकळा केला. आता तरी यापुढे प्रशासनाने या गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

याप्रसंगी श्रमदान करताना ॲड. पवनराजे मित्रपरिवाचे सदस्य संदीप पाटोळे , पवन डापके, राहुल तायडे, अजीज शाह, शुभम पाटील, भोला पाटी, फिरोज शाह, अल्ताफ शाह आदी उपस्थित होते.

पुलावरील ड्रेनेज होलची साफसफाई करताना ॲड. पवनराजे पाटील, संदीप पाटोळे, पवन डापके आदी. (छाया : विनायक वाडेकर)

Web Title: Cleaning of drainage pipe on the bridge at Khamkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.