स्वच्छतेचा संदेश देणा:या शॉर्टफिल्मला ‘बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड’

By Admin | Updated: April 15, 2017 16:04 IST2017-04-15T16:04:29+5:302017-04-15T16:04:29+5:30

‘ओजस्विनी’च्या दोन विद्यार्थिनींनी घेतली मेहनत

Cleaner Messaging: Or shortfilmom 'Best Excellence Award' | स्वच्छतेचा संदेश देणा:या शॉर्टफिल्मला ‘बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड’

स्वच्छतेचा संदेश देणा:या शॉर्टफिल्मला ‘बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड’

अजय पाटील

जळगाव,दि.15 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. यामध्ये युवकांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग आहे,  हा सहभाग वाढावा यासाठी केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय व नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (एन.एफ.डी.सी) कडून आयोजित स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेत जळगावच्या ओजस्विनी कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी जयश्री बारी व विद्यार्थी विजय बारी यांनी स्वच्छतेच्या संदेश देणा:या दोन वेगवेगळ्या शॉर्ट फिल्मला अवघ्या महाराष्ट्रातून ‘बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. 
 स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेत देशभरातील 4 हजार 500 विद्याथ्र्यानी आपला सहभाग घेतला होता. जयश्री बारी हिने ‘स्वच्छता की और एक कदम’ तर विजय बारी यांनी ‘खुद बदलो, भारत बदलेगा’ या विषयावरील शॉर्ट फिल्म तयार केल्या.अजिंठा चौफुली जवळील एका रेस्टॉरंट मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी नाश्ता करताना त्यांच्याकडून घाण केली जाते, मात्र त्याच ठिकाणावरून मार्गस्थ होत असलेल्या दोन शाळकरी विद्याथ्र्याकडून ती घाण स्वच्छ केली जाते. त्यानंतर त्या महाविद्यालयीन विद्याथ्र्यामध्ये झालेला बदल यामध्ये दाखविण्यात आला आहे. 
प्रत्येकजण कचरा फेकल्यानंतर तो स्वच्छ करण्याची जबाबदारी ही केवळ महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचीच असते असा गैरसमज आहे.  मात्र हा देश आपला, व देशाला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. ही जाणीव या शॉर्टफिल्म मधून आजच्या पिढीला करून देण्यात आली आहे. ‘बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल या दोन्ही विद्याथ्र्याचा केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, ओजस्विनीचे प्राचार्य अविनाश काटे, प्रा.योगेश लहाने, प्रा.पुरुषोत्तम घाटोळ यांनी सत्कार केला. 

Web Title: Cleaner Messaging: Or shortfilmom 'Best Excellence Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.