शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘बीएचआर’मधील २८४ कोटींचे दावे रखडले! अवसायकांना मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 15:57 IST

नासरे यांचा अवसायकपदावर १७ जानेवारी २०२३ पर्यंत नियुक्ती होती.

- कुंदन पाटील

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायक म्हणून चैतन्य नासरे यांना गुरुवारी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी बीएचआर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार दाखल झालेल्या २८४ कोटींच्या दाव्यांचे भवितव्य न्यायालयीन प्रक्रिया आणि एकरकमी तडजोडींवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे बीएचआर प्रशासनाच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा राज्यातील ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

नासरे यांचा अवसायकपदावर १७ जानेवारी २०२३ पर्यंत नियुक्ती होती. दि.६ जानेवारी रोज नासरे यांनी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज केंद्रीय प्रबंधकांकडे केला होता. नासरेंचा नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर शिरपूरचे उपनिबंधक अशोक बागुल यांनी अवसायक म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठी अर्ज केला. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर अवसायक नियुक्तीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. 

दि.२० रोजी केंद्रीय सहकार प्रबंधक विजयकुमार यांनी नासरे यांच्या नियुक्तीला अनिश्चीत कालावधीसाठी मुदतवाढ दिले. त्यानंतर गेल्यावर्षी ‘बीएचआर’ने केलेल्या आवाहनानुसार दावे दाखल करणाऱ्या ठेवीदारांचे लक्ष पुन्हा ‘बीएचआर’ प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.

२८४ कोटींचे दावेगेल्यावर्षी ‘बीएचआर’ प्रशासनाने ठेवीदारांना ठेव रकमेच्या परताव्यासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दस्ताऐवजासह ठेवीदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत २८४ कोटींचे दावे दाखल केले आहेत. अवसायक नियुक्तीच्या व न्यायालयीन प्रक्रिया लांबत गेली. त्यामुळे ठेवीदारांच्या दावे थंडबस्त्यातच राहिले.

२८ कोटींचा परतावागेल्यावर्षी कर्जदारांकडून वसूल झालेल्या रकमेच्या माध्यमातून ठेवीदारांना २घ कोटींचा परतावा देण्यात आला होता. २०२३ मध्ये मात्र ठेवीदारांना दमडीचाही परतावा न मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता.

नियमित काम सुरु आहे. न्यायालयीन कामकाज आणि एकरकमी तडजोडींच्या माध्यमातून दावे दाखल करणाऱ्या ठेवीदारांना न्याय देण्याची प्रशासनाची भूमिका राहणार आहे.-चैतन्य नासरे, अवसायक, बीएचआर पतसंस्था

टॅग्स :Jalgaonजळगाव