शहराची चिंता वाढलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:49+5:302021-09-13T04:16:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील केवळ जळगाव शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव ...

The city's anxiety increased | शहराची चिंता वाढलीच

शहराची चिंता वाढलीच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील केवळ जळगाव शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहरात तीन बाधित रुग्ण आढळून आल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे. हे तीनही रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत असल्याची माहिती आहे. आता केवळ भुसावळ, जळगाव शहर आणि चोपडा, पाचोरा या ठिकाणीच सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात रविवारी ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर उर्वरित १४ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मुक्ताईनगरातील एकमेव रुग्ण बरा झाल्याने तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. आता जळगाव शहरात १५, भुसावळ ७ आणि पाचोरा व चोपडा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णांवर अशा २४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी झालेली आहे. जिल्ह्यात रविवारी ४४५ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. त्यात ३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ७३० ॲन्टीजन चाचण्यांमध्ये एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

बाहेरून प्रवास धोक्याचा

शहरात बाधित आढळून आलेल्यांमध्ये आता बाहेरून प्रवास करून आलेल्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी बाधित आढळून आलेल्या एका तरूणाचा बाहेर प्रवास नव्हता मात्र, तो ज्या व्यक्तीकडे कामाला होता. ती व्यक्ती बाहेरील जिल्ह्यातून प्रवास करून आलेली होती. त्यामुळे अन्य जिल्ह्यात होणारी रुग्णवाढ ही शहरासाठी चिंतेचा विषय झाली आहे. दरम्यान, रविवारी बाधित आढळून आलेल्या तिघांचे अहवाल हे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या लॅबमधील असल्याची माहिती आहे.

Web Title: The city's anxiety increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.