यावलचे प्रभारी नगराध्यक्ष कोलतेंना जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:37 IST2020-04-09T18:37:09+5:302020-04-09T18:37:55+5:30
यावल : येथील प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांच्या व्हाटस्अपवर अज्ञात व्यक्तीने खुनाची धमकी दिली आहे. याप्रकरणी संशयीत अज्ञात ...

यावलचे प्रभारी नगराध्यक्ष कोलतेंना जीवे मारण्याची धमकी
यावल : येथील प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांच्या व्हाटस्अपवर अज्ञात व्यक्तीने खुनाची धमकी दिली आहे. याप्रकरणी संशयीत अज्ञात आरोपी विरूध्द येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोलते यांच्या ९८६०७२९८५२ या मोबाईल क्रंमांकांच्या व्हाटस्अपवर ७७४४८८८३६६ या मोबाईल क्रमांकावरील व्हाटस्अपवरून आलेल्या संदेशात अश्लील शिवीगाळ करत म्हटले आहे की, ३३ दिवसानंतर तुझा ३०२ करणार असून मी राजेंद्र आर. पवार व्यंकटेश नगर हरीविठ्ठल रोड जळगाव असे संदेशात नमूद आहे.
कोलते यांच्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द भादवी कलम ५०४, ५०६, ५०७ प्रमाणे अदखपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली असून याप्रकारणी पो. नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. नेताजी वंजारी पुढील तपास करीत आहेत.