दगडी दरवाजाच्या पुनर्निर्माणसाठी नागरिकांचे निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST2021-06-19T04:11:40+5:302021-06-19T04:11:40+5:30
ठेकेदार काम करीत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. मुकुंद विसपुते, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, माजी ...

दगडी दरवाजाच्या पुनर्निर्माणसाठी नागरिकांचे निषेध आंदोलन
ठेकेदार काम करीत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. मुकुंद विसपुते, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार, जयश्री दाभाडे, राजेंद्र पोतदार, बाळासाहेब संदानशिव, नावीद शेख, पंकज भावसार, अक्षय अग्रवाल, पराग चौधरी, माजी जिल्हानियोजन समितीचे सदस्य पंकज चौधरी आदींनी समिती स्थापन केली व विविध तारखांना आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. १७ रोजी गुरुवारी पानखिडकी ते दगडी दरवाजापर्यंत दुकानावर व घरांवर काळे झेंडे लावण्यात आले. १८ रोजी शुक्रवारी व्यापारी व नागरिक काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणार आहेत. १९ रोजी शनिवारी दगडी दरवाजाजवळ सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत घंटानाद व थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. २० रोजी रविवारी बैठक व चर्चा करणे. २१ रोजी सोमवारी इच्छापूर्ती देवी मंदिर, पानखिडकी येथे आरती करून ढोल वाजवत नगर परिषदेत जाऊन नगराध्यक्षांना स्मरणपत्र व नगराध्यक्षांच्या निवासाबाहेर ढोल वाजविण्यात येणार आहे. खासदार, आमदार, नगराध्यक्ष, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन पाठवणे), अशी रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.
समितीच्या कार्यात इच्छुक सदस्यांनी स्वत:हून सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
त्यास अनुसरून दगडी दरवाजाजवळ निषेधाचा लक्ष वेधून घेणारा फलक लावण्यात आलेला आहे.
तसेच दगडी दरवाजापासून ते पानखिडकीपर्यंत दुकानांना काळे झेंडे लावण्यात आले.