नागरिकांच्या तक्रारींची घेतली जाईल तत्काळ दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:21+5:302021-09-24T04:19:21+5:30
रमेश चोपडे यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांची नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली ...

नागरिकांच्या तक्रारींची घेतली जाईल तत्काळ दखल
रमेश चोपडे यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांची नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाल्याने नाशिकच्या गुप्तचर विभागाचे उपायुक्त रमेश चोपडे यांनी चाळीसगाव विभागाचा पदभार स्वीकारला.
चौकट
गुन्हेगारी मोडून काढणार
गुप्तचर विभागात पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असल्याने जळगाव जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्वाची माहिती आहे. त्यामुळे गुन्हेगारी कायदेशीर मार्गाने मोडून काढू, असेही त्यांनी सांगितले. पोलीस वसाहतीमधील कर्मचाऱ्यांची काही घरे जीर्ण झाली असून, मोडकळीस आली आहे. या घरांसह वसाहतीतील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही राहणार आहे, असे चोपडे यांनी आश्वासित केले.
चौकट
जामदा येथे केले शांततेचे आवाहन
पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ जामदा येथे दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनांस्थळी रमेश चोपडे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मेहुणबारे पोलीस स्थानकात परस्परविरोधी गुन्हे दाखल असल्याने दोन्ही गटांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.