शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

गणेश विसर्जनस्थळी येण्यास नागरिकांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 12:52 IST

गणेश विसर्जनस्थळी येण्यास नागरिकांना बंदी

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा गणेशोत्सवात बाप्पाचे आगमन व विसर्जनाची मिरवणूक निघणार नाही. शासनाने त्याला बंदी घातली आहे त्याशिवाय शारीरिक अंतर ठेवून शासनाच्या नियमानुसार हा उत्सव पार पाडावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांनी केले आहे. विसर्जनासाठी मूर्ती कलेक्शन सेटर सुरु करण्यात येणार आहे.आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’ जवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती व खासगी मूर्र्तींना थेट तलाव इतर ठिकाणी विसर्जनास शासनाने बंदी घातली आहे. जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्यावतीने वार्डनिहाय तसेच मंडळाच्या ठिकाणी मूर्ती कलेक्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडीेल मूर्ती कलेक्शन सेंटर वरच आणाव्यात. तेथून आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मंडळ व प्रशासनाच्या वतीने सजवलेल्या रथात अथवा वाहनात या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येणार आहेत, खाजगी व्यक्तीने तलावाच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता नाही. तेथे त्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय जळगाव शहरापुरता नाही तर संपूर्ण जिल्ह्यात लागू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी स्पष्ट केले आहे. मंडळाच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा ठेवून लाऊड स्पीकरला परवानगी दिली आहे.-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.-कोरोना असला तरी नागरिकांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा,मात्र कुठेही कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे काम करू नये.-सोशल मीडिया अथवा इतर ठिकाणी अफवा पसरविणाºया लोकांवर कडक कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.-दरम्यान,याच काळात अडीच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.असे आहेत जिल्ह्यातील मंडळएकुण मंडळ २३२१सार्वजनिक १७०१खासगी ४७९एक गाव एक गणपती १४१ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव