पाळधीतील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिक हैराण, नागरी सुविधांवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:01+5:302021-09-24T04:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाळधी, ता. जामनेर : पाळधीसह परिसरात ट्रान्सफॉर्मर वारंवार नादुरुस्त होत आहे. नवीन ट्रान्सफॉर्मरही वेळेवर मिळत ...

पाळधीतील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिक हैराण, नागरी सुविधांवर ताण
लोकमत न्यूज नेटवर्क
पाळधी, ता. जामनेर : पाळधीसह परिसरात ट्रान्सफॉर्मर वारंवार नादुरुस्त होत आहे. नवीन ट्रान्सफॉर्मरही वेळेवर मिळत नसल्याने गावकऱ्यांना अंधारात राहावे लागत आहे. यासाठी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय, भुसावळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
तसेच पाणीपुरवठा करण्यास व पीठ गिरणीसाठी गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी. तसेच गावाची लोकसंख्या लक्षात घेऊन व गावाचा विस्तार विचारात घेता उपलब्ध असलेल्या ट्रान्सफॉर्मरची संख्याही कमी आहे. गावासाठी अजून दोन ते तीन नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. तरच गावातील वाढीव वस्तीतील विजेचा प्रश्न मिटेल. गावातील वीजखांबावरील वीजताराही जीर्ण झाल्या आहेत. त्या काढून त्याठिकाणी केबल टाकण्यात यावी व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, असे निवेदन भुसावळ येथील कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
यावेळी सरपंच प्रशांत बाविस्कर, माजी सरपंच कमलाकर पाटील, ग्रा. पं. सदस्य देवचंद परदेशी, संदीप सुशीर, मनोज नेवे, संजय शेळके आदी उपस्थित होते.