पहूर, ता. जामनेर : येथील शिवनगर भागात विज चोरी रोखण्यासाठी विज केबल टाकण्याचे काम सुरु आहे. यामुळे काही भागात पंधरा दिवसांपासून विजपूरवठा खंडित झाला असल्याने विजपूरवठा सुरळीत करण्याच्या मागणी साठी येथील संतप्त नागरिकांचा जमाव पोलीस स्टेशन व पेठ ग्रामपंचायत वर शुक्रवारी संध्याकाळी धडकला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला.सुरुवातीलाहा जमाव पोलीस स्टेशनवर पोहोचला .तेथे कनिष्ठ अभियंता संजय सरताळे यांनी संतप्त जमावाला केबलचे काम पावसामुळे थांबले असून शनिवारी ते करण्यात येणार असल्याचे सांगितले. तेथून हा जमाव पेठ ग्रामपंचायत वर धडकला माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, कृउबास सभापती संजय देशमुख, भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, शहर अध्यक्ष संदीप बेढे यांच्या समोर नागरिकांनी समस्या मांडली असता त्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता सरताळे यांच्याशी भ्रमनध्वनीवर चर्चा करून जमावाला शांत केले.
पहूरचे नागरीक विजेसाठी धडकले ग्रा. पं. वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:11 IST