मंडळांतर्फे गरजूंना अन्नदान अन् ब्लॅंकेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:38+5:302021-09-18T04:18:38+5:30

प्रभात चौक मित्रमंडळ प्रभात चौक मित्रमंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कुठल्याही प्रकारची आरास सादर केलेली नाही. मंडळातर्फे विविध भागात राहणाऱ्या ...

Circles distribute food and blankets to the needy | मंडळांतर्फे गरजूंना अन्नदान अन् ब्लॅंकेट वाटप

मंडळांतर्फे गरजूंना अन्नदान अन् ब्लॅंकेट वाटप

प्रभात चौक मित्रमंडळ

प्रभात चौक मित्रमंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कुठल्याही प्रकारची आरास सादर केलेली नाही. मंडळातर्फे विविध भागात राहणाऱ्या बेघर नागरिकांना अन्नदान व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. तसेच मास्कही वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे मंडळातर्फे कोरोनाकाळात लॉकडाऊन असताना, अनेक गरजूंना अन्नदान करण्यात आले. मंडळाची स्थापना २००८ मध्ये झाली असून, सध्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून आदित्य नेमाडे तर उपाध्यक्ष म्हणून राम महाजन हे काम पाहत आहेत.

श्री अनंत गणेश मंडळ

एम. जे. कॉलेज रोडवरील श्री अनंत गणेश मंडळातर्फे शहरातील विविध भागात राहणाऱ्या गरजू व्यक्तींना अन्नदान व मास्क वाटप करण्यात आले. तसेच या नागरिकांना लसीकरण करून घेण्याबाबतही आवाहन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष म्हणून परम मयूर तर उपाध्यक्ष म्हणून अभिषेक शेवाळे हे कामकाज पाहत आहेत.

Web Title: Circles distribute food and blankets to the needy