मंडळस्तरीय संगणीकृत सातबारा दुरुस्ती शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:22+5:302021-06-24T04:13:22+5:30
सावखेडा, ता. रावेर : खिरोदा प्र. यावल ये थेरावेर मंडळातील खिरोदा प्र. यावल, कोचूर बुद्रुक, चिनावल, सावखेडा ...

मंडळस्तरीय संगणीकृत सातबारा दुरुस्ती शिबिर
सावखेडा, ता. रावेर : खिरोदा प्र. यावल ये थेरावेर मंडळातील खिरोदा प्र. यावल, कोचूर बुद्रुक, चिनावल, सावखेडा बुद्रुक, उटखेडा व लोहारा या सजेतील गावांमधील संगणीकृत सातबाऱ्यामधील चुका दुरुस्तीसाठी मंडळस्तरीय शिबिर २५ जूनला केले आहे.
संगणकीकृत सातबारामधील चुका दुरुस्ती करणे (१५५ अंतर्गत) संगणकीकृत सातबारा हस्तलिखित सातबाऱ्याचे वाचन करणे, फेरफार नोंद दाखल करण्यासाठीचे अर्ज स्वीकारणे, ज्या फेरफार नोंदी प्रमाणिकरणासाठी उपलब्ध असतील त्या निर्गत करणे, संगणकीय अहवाल ओडिसी प्रणीत अहवाल दुरुस्ती करणे. संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये अद्यापही काही चुका असतील, तर या शिबिरात स्वतः कागदपत्रांसह उपस्थित राहून स्वतःच्या चुका दुरुस्ती करून घ्याव्यात. ज्या संगणकीकृत चुका तलाठी अथवा मंडळ अधिकारी स्तरावर दुरुस्त करणे शक्य नसतील, त्यांच्याबाबतचा अहवाल आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसीलदारांना सादर करण्यात येतील. या शिबिराचा परिसरातील मंडळातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महसूल मंडळातर्फे करण्यात आले आहे.