कंजरवाड्यात सिनेस्टाईल लूट

By Admin | Updated: May 21, 2014 01:24 IST2014-05-21T01:24:37+5:302014-05-21T01:24:37+5:30

दुचाकीचा लाईट फोडला : ४७ हजारांचा ऐवज लुटला

Cincinnati loot in Kanjarwada | कंजरवाड्यात सिनेस्टाईल लूट

कंजरवाड्यात सिनेस्टाईल लूट

 जळगाव : कंजरवाडा भागात रात्री उशिरा दारू पिण्यासाठी गेलेल्या दोन जणांना शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास याच भागातील तीन जणांनी मारहाण करीत ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश कॉलनी भागातील नीरज शरद काळे हे मित्र धर्मेंद्र वर्मा यांच्यासह कंजरवाडा भागात बिअर पिण्यासाठी गेले होते. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास दोघे जात असताना कंजरवाडा भागातील राहुल कंजर, नितीन कंजर, आकाश कंजर यांनी दोघांची एमएच १९/बीएल ८४३३ ही दुचाकी थांबविली. काळे व वर्मा हे दारूच्या नशेत असल्याचे आरोपींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही दुचाकी थांबविली. त्यानंतर राहुल कंजर व त्याच्या सहकार्‍यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने दुचाकीचा हेडलाईट फोडला. आरोपींनी काळे व वर्मा यांच्याकडील दहा ग्रॅम सोन्याची चेन, खिशातील रोख रक्कम असा ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज तसेच एटीएम कार्ड, पॅन कार्ड व तीन मोबाइल हिसकावून घेतले. या दरम्यान दोघांना मारहाण करीत पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारू अशी धमकी दिली. मोबाइलच्या साहाय्याने आपण पकडले जाऊ या भीतीने या तिघा आरोपींनी काळे व वर्मा यांचे नऊ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल परत केले. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला नीरज काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल कंजर, नितीन कंजर, आकाश कंजर या तिघांविरुद्ध भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक निरीक्षक आर.टी. धारबळे करीत आहेत.

Web Title: Cincinnati loot in Kanjarwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.