शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

जळगावच्या बाजारपेठेत कोथिंबीरचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:11 IST

दर १००० ते ३००० रुपये प्रती क्विंटलने वाढले

जळगाव : जळगावच्या बाजारपेठेत आवक घटत असल्याने कोथिंबीरचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरचे दर १००० ते ३००० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.गेल्या आठवड्यात २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल असलेल कोथिंबीरचे दर हे ३००० ते ७००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. गेल्या आठवड्यात वधारलेल्या वांग्याच्या दरात घसरण झाली असून इतर भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक घटली असून त्याचे दरही ३५० ते १२५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.या सोबतच कारले २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दर हे पुढील प्रमाणे आहे. बटाटे ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल, टमाटे १००० ते २००० रुपये प्रती क्विंटल, भेंडी १५०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, कैरी १००० ते ३००० रुपये प्रती क्विंटल, खिरा ८०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - २००० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, गवार - ३००० ते ७००० रुपये प्रती क्विंटल, लिंबू २१०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ७०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, मेथी ३००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल, पालक २५०० रुपये प्रती क्विंटल, अद्रक ३३०० ते ७५०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची २००० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - १००० ते २००० रुपये प्रती क्विंटल, गिलके २००० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - ४५०० रुपये प्रती क्विंटल, शिमला मिरची - १५०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल.

टॅग्स :Jalgaonजळगाव