एटीएम कार्ड बदल करीत 30 हजारांना लावला चुना
By Admin | Updated: June 27, 2017 16:21 IST2017-06-27T16:21:35+5:302017-06-27T16:21:35+5:30
जळगाव मनपा कर्मचा:याला लुबाडले : एटीएमच्या कॅबिनमध्ये धक्का मारत बदल केले एटीएम कार्ड

एटीएम कार्ड बदल करीत 30 हजारांना लावला चुना
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.27 - एटीएम मशिनमधून पैसे काढत असताना कॅबिनमध्ये असलेल्या एकाने चोरुन गोपनीय कोड लक्षात ठेवला व धक्का मारुन एटीएम कार्ड खाली पाडले. ते कार्ड उचलून प्रामाणिकपणाने देण्याचा बहाणा करीत हातचलाखीने कार्ड बदल करुन दुसरेच कार्ड दिले व नंतर दुस:या मशिनमध्ये जावून 30 हजार रुपये काढत मनपा कर्मचा:याला चुना लावल्याची घटना 24 रोजी अजिंठा चौकात झाली.
मनपात कर्मचारी असलेल्या किरण सुभाष शिंदे (रा.रामानंद नगर,जळगाव) हे 24 जून रोजी दुपारी पावणे चार वाजता अजिंठा चौकातील अॅक्सिस बॅँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. शिंदे पैसे काढत असताना त्यांच्यामागे एक व्यक्ती उभी होती. पैसे काढण्याची प्रक्रिया करीत असताना मागे असलेल्या एका जणाने कार्डचा गोपनीय क्रमांक लक्षात ठेवला. शेजारी असलेल्या मशिनजवळ जावून थांबला. शिंदे यांनी दहा हजार रुपये काढल्यानंतर मशिनमधून कार्ड बाहेर काढताना शिंदे यांना त्याने धक्का मारला, त्यामुळे हातातील कार्ड खाली पडले.
या चोरटय़ाने प्रामाणिकपणाचा व मदतीचा आव आणत खाली पडलेले कार्ड उचलले व हातचलाखीने ते कार्ड दुस:या हातात घेवून त्याच बॅँकेचे दुसरे कार्ड शिंदे यांच्या हातात दिले. त्यानंतर चोरटा तेथून निघून गेला. शिंदे यांनी पुन्हा पैसे काढण्यासाठी मशिनमध्ये कार्ड टाकले, मात्र तेव्हा पैसेच निघाले नाही. मशिन किंवा कार्डमध्ये तांत्रिक अडचण असावी म्हणून ते दुस:या एटीएम मशिनवर गेले. तेथेही पैसे निघाले नाहीत.
आपल्याजवळील एटीएममधून पैसे निघत नसताना 3.59 वाजता 10 हजार रुपये व त्यानंतर 4 वाजता दुसरा व त्यानंतर पुन्हा 4 वाजून 53 सेंकदाने असे एकापाठोपाठ तीन संदेश शिंदे यांना मोबाईलवर प्राप्त झाले. आपल्याला कोणीतरी गंडविल्याची खात्री शिंदे यांना झाली.त्यामुळे त्यांनी मंगळवारी दुपारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली.