शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा येथे नगराध्यक्षांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 15:22 IST

शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला. गुरुवारी झालेल्या सभेप्रसंगी संतप्त शहरवासीयांनी नगराध्यक्ष यांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक केली. मोर्चेकºयांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील काचांसह त्याच ठिकाणी मडके फोडले. हा गोंधळ तब्बल चार तास सुरू होता.

ठळक मुद्देचोपड्याचा पाणी प्रश्न पेटलानगराध्यक्षांच्या दालनात मोर्चेकऱ्यांनी टेबलवरील काच व हंडे फोडलेचार तास गोंधळ सुरु

चोपडा : शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला. गुरुवारी झालेल्या सभेप्रसंगी संतप्त शहरवासीयांनी नगराध्यक्ष यांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक केली. मोर्चेकºयांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील काचांसह त्याच ठिकाणी मडके फोडले. हा गोंधळ तब्बल चार तास सुरू होता.शहरातील मल्हारपुरा, रंगराव आबा नगर, सानेगुरुजी वसाहत यासह इतर भागात पिण्याचे पाणी दहा ते बारा दिवसांपासून येत नसल्याने व मल्हार पुरा भागातील नादुरुस्त कूपनलिकाही महिनाभरापासून पालिकेने दुरुस्त न केल्याच्या संतापाने या भागातील महिला व नागरिकांनी ६ रोजी सर्वसाधारण सभेचे औचित्य साधत पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा आणला. मोर्चाचे नेतृत्व या भागातील शिवसेनेचे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष किशोर चौधरी, संध्या महाजन यांनी केले. मोर्चेकरी प्रचंड संतप्त झाले होते. त्यांनी प्रशासकीय इमारतीचे चॅनल गेट लावले असता ते उघडून वेगात पळत जाऊन नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांच्या दालनात प्रवेश केला. त्यांना घेराव घातला व नगराध्यक्षांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक केली. नगराध्यक्षांच्या टेबलावरील काच फोडल्या. तेथेच मातीचे हंडे फोडले. मोर्चेकरी संतप्त असल्याने कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

टॅग्स :ChopdaचोपडाJalgaonजळगाव