जळगावात तरुणावर चॉपरने हल्ला
By Admin | Updated: April 16, 2017 17:16 IST2017-04-16T16:53:08+5:302017-04-16T17:16:39+5:30
योगेश नामदेव इंगळे (वय 28 रा. आसोदा रोड, जळगाव) या तरुणावर एकाने लाकडी दांडक्याने तर दुस:याने कपाळावर चॉपरने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजता कांचन नगरात घडली.

जळगावात तरुणावर चॉपरने हल्ला
जुना वाद : जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
जळगाव,दि.16- मित्रांसोबत थांबलेला असताना काहीही न विचारता योगेश नामदेव इंगळे (वय 28 रा. आसोदा रोड, जळगाव) या तरुणावर एकाने लाकडी दांडक्याने तर दुस:याने कपाळावर चॉपरने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजता कांचन नगरात घडली. जखमी योगेशला नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
योगेश इंगळे व कृष्णा साहेबराव सपकाळे यांच्यात शनिवारी रात्री मस्करीतून वाद निर्माण झाला होता. काही जणांनी मध्यस्थी केल्याने हा वाद निवळला होता. रविवारी दुपारी योगेश हा मोहन टॉकीजजवळ मित्रांसोबत उभा असताना कृष्णा याने त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचा भाऊ श्याम सपकाळे याने योगेशच्या कपाळावर चॉपरने हल्ला केला. यात त्याचा डोळा थोडक्यात बचावला आहे.