पोलिसात फिर्याद दिली म्हणून तरुणावर केला चॉपर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST2021-02-09T04:18:01+5:302021-02-09T04:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जुन्या वादातून संतोष सुभाष कोळी (२२, रा. कुसुंबा) या तरुणावर राहुल मराठे याने चॉपरने ...

पोलिसात फिर्याद दिली म्हणून तरुणावर केला चॉपर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जुन्या वादातून संतोष सुभाष कोळी (२२, रा. कुसुंबा) या तरुणावर राहुल मराठे याने चॉपरने हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडे सात वाजता एमआयडीसीतील हॉटेल सुमेरसिंगच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी राहुल मराठे व नीलेश उर्फ बाबा या दोघांवर सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कोळी व सागर केदार हे दोघे मित्र रविवारी सायंकाळी एमआयडीसीतून जात असताना सुमेरसिंग हॉटेलच्या पाठीमागे राहुल मराठे व नीलेश उर्फ बाबा असे दुचाकीने येत असताना संतोष याची दुचाकी अडविली. संतोष याने राहुल याच्याविरुध्द पूर्वी गुन्हा दाखल केलेला असल्याने त्याने वाद घालायला सुरुवात करत दोघांना दुचाकीवरुन ढकलले व नंतर काही क्षणातच चॉपर काढून पाठीवर वार केले. यात चक्कर येऊन पडलेल्या संतोष याला मित्र सागर केदार याने उठविले असता त्यालाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. रस्त्याने लोक येत असल्याचे पाहून दोघांनी पलायन केले. संतोष याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी संतोष कोळी याच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.