चोपडय़ात बहुजन क्रांतीतर्फे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 17:15 IST2017-05-08T17:15:04+5:302017-05-08T17:15:04+5:30

शेतीमालाला हमी भाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Chopdaaya Front of Bahujan Kranti Front | चोपडय़ात बहुजन क्रांतीतर्फे मोर्चा

चोपडय़ात बहुजन क्रांतीतर्फे मोर्चा

 चोपडा,दि.8- शेतक:यांचे  वीजबिल माफ करावे, शेतक:यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतीमालाला हमी भाव देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

 8 रोजी सकाळी 11.30 वाजता विश्राम गृहापासून मोचार्ला सुरुवात झाली. विश्राम गृह , पेट्रोल पंप, बस स्थानक , छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड मार्गे  मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार स्वप्नील सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व राजू खरे जामनेर, अरुण शिंदे, विनोद तडवी, जियाउद्दीन काझी, हाजी असदअली सैयद , विजय शंभरकर, जितेंद्र साळुंखे, सुलेमान तडवी, मेहेरबान तडवी, अय्युब तडवी, माजी सभापती गोपाळ सोनवणे , रमेश ठाकूर, रमेश माळी, जितेंद्र भिल, विकास बारेला, शुभम साळुंखे, जितेंद्र साळुंखे, संजय कोळी, संजय शिरसाठ , हरचंद धनगर, अक्रम अली, फिरोज पटेल, फारुख शेख, नेहान अहमद, मतीन पटेल, सकलेन खाटीक, रिजवान पटेल आदींनी केले. 

Web Title: Chopdaaya Front of Bahujan Kranti Front