चोपडा नायब तहसीलदारास मारहाण करणाऱ्यास दोन दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 14:39 IST2020-01-19T14:38:08+5:302020-01-19T14:39:48+5:30
फाट्यावर गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनास ताब्यात घेताना नायब तहसीलदास मारहाण करणाºया तिघां आरोपींपैकी एकास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली

चोपडा नायब तहसीलदारास मारहाण करणाऱ्यास दोन दिवस पोलीस कोठडी
चोपडा, जि.जळगाव : फाट्यावर गौणखनिज वाहतूक करणाºया वाहनास ताब्यात घेताना नायब तहसीलदास मारहाण करणाºया तिघां आरोपींपैकी एकास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दोघे अद्याप फरार आहेत.
शहरातील यावल-चोपडा रस्त्यावर माचला फाट्याजवळ गौणखनिज वाहतूक करणाº्या विना नंबरच्या ट्रॅक्टरचा ताबा घेताना वाळू तस्करांनी नायब तहसीलदार राजेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे (४६) यांना मारहाण केली होती. याबाबत तिघांविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी चालक जयवंत बलदेव कोळी यास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र अन्य दोघे आरोपी कैलास तायडे व विजय कोळी हे अद्याप फरार आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे करीत आहेत.