चोपड्याच्या प्रीतेशचे यश सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:31 IST2019-07-01T21:31:10+5:302019-07-01T21:31:17+5:30

चोपडा : अमेरिका येथे पार पडलेल्या अ‍ॅरो डिझाईन स्पर्धेत चोपडा येथील प्रीतेश प्रफुल्ल याने सहभाग घेऊन यश मिळविले आहे. ...

Chopad's love story Satasamprayapar | चोपड्याच्या प्रीतेशचे यश सातासमुद्रापार

चोपड्याच्या प्रीतेशचे यश सातासमुद्रापार



चोपडा : अमेरिका येथे पार पडलेल्या अ‍ॅरो डिझाईन स्पर्धेत चोपडा येथील प्रीतेश प्रफुल्ल याने सहभाग घेऊन यश मिळविले आहे. येथील काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विमान संचार शास्त्र संघातर्फे त्याने या स्पर्धेत सहभाग घेतला. विमान निर्मितीशी संबंधित अभ्यास आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आली आहे. ही स्पर्धा नुकतीच कॅलिफोर्नियामधील व्हेन न्युस येथे पार पडली. यात विद्यार्थ्यांना विमानाच्या प्रतिकृती निर्माण कराव्या लागतात. त्याच्या अनेक तपासण्या होतात.
येथील नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे त्याला स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभले.

Web Title: Chopad's love story Satasamprayapar