‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:01+5:302021-07-27T04:17:01+5:30

स्टार ९७२ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रावर परिणाम झालेला असताना तरुणांना रोजगार मिळणे कठीण होत ...

Choice of 'girl' postponed due to lack of 'job' guarantee | ‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर

‘नोकरी’ची गॅरंटी नसल्याने ‘छोकरी’ची निवड लांबणीवर

स्टार ९७२

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रावर परिणाम झालेला असताना तरुणांना रोजगार मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे नोकरीअभावी लग्न तरी कसे करावे, या विचाराने लग्न लांबणीवर टाकले जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विवाह नोंदणी कार्यालयात यंदाची आकडेवारी पाहिली असता त्यात लग्नाची संख्या थोडीफार कमी होताना दिसून येते. कोरोनामुळे सर्वांनाच विचार करायला लावणारी स्थिती आल्याने विवाह लांबणीवर टाकत असल्याचेही तरुण सांगत आहे.

फारसा फरक नाही

कोरोनामुळे बेरोजगारीची स्थिती निर्माण झाली असली तरी विवाह नोंदणीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. दर महिन्याला सरासरी एवढे विवाह होतात. थोडेफार कमी-जास्त होत असतात.

- के.पी. चौधरी, विवाह नोंदणी अधिकारी

सात महिन्यांत थोडीफार घट

१) गेल्या तीन वर्षांची स्थिती पाहिली असता २०१८ नंतर २०१९ मध्ये नोंदणी विवाहांची संख्या वाढून ती ४२६ वर पोहोचली, तसेच २०२० मध्ये ही संख्या ४३६ वर पोहोचली.

२) त्यानंतर २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात ५२ विवाह झाले. नंतर ते कमी कमी होत जात जुलैमध्ये (२६ पर्यंत) ३९ वर आले.

१) कधी किती झाले नोंदणी विवाह?

२०१८ - ३८०

२०१९-४२६

२०२० -४३६

२०२१ जानेवारी - ५२

२०२१ फेब्रुवारी -४८

२०२१ मार्च -४४

२०२१ एप्रिल -४२

२०२१ मे -४०

२०२१ जून -४१

२०२१ जुलै -३९

कठीण काळात दोनाचे चार हात कसे होणार?

कोरोनामुळे बिकट स्थिती निर्माण झाल्याने आर्थिक घटी विस्कटली आहे. अगोदरच रोजगाराची चिंता आहे. त्यात लग्न केल्यास संसार कसा चालणार याची चिंता असल्याने लग्न करणे थांबविले आहे.

- गजानन सोनवणे, तरुण

गेल्या वर्षभरापासून काम शोधत आहे. कंपनीत नोकरी लागेल, ही अपेक्षा होती. मात्र, कोरोनाचे कारण सांगून मंदी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रोजगार मिळत नसल्याने लग्नही कसे करावे, असा विचार येतो. यामुळे सध्या लग्न करण्याचा विचार लांबणीवर टाकला आहे.

- जयेश महाकाळ, तरुण

Web Title: Choice of 'girl' postponed due to lack of 'job' guarantee