जामनेर वॉटर कप स्पर्धेचा मिळालेला पुरस्कार चिंचोली पिंप्री ग्रामस्थांनी केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 03:05 PM2019-08-14T15:05:27+5:302019-08-14T15:06:46+5:30

पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जामनेर तालुक्यातून चिंचोली पिंप्री गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र गावाचे ग्रामस्थ व सरपंच यांनी १३ रोजी गावात ग्रामसभा घेऊन हे बक्षीस व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला व आज १२ वाजता जवळपास ३०० ते ४०० ग्रामस्थ तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा पुरस्कार परत केला व निवेदन दिले.

Chincholi Pimpri villagers win back Jamnar Water Cup | जामनेर वॉटर कप स्पर्धेचा मिळालेला पुरस्कार चिंचोली पिंप्री ग्रामस्थांनी केला परत

जामनेर वॉटर कप स्पर्धेचा मिळालेला पुरस्कार चिंचोली पिंप्री ग्रामस्थांनी केला परत

googlenewsNext
ठळक मुद्दे राज्यस्तरीय पुस्कारांमध्ये डावलल्याचा केला आरोपतहसीलदारांना पुरस्कार केला परत

मोहन सारस्वत/लियाकत सैयद
जामनेर, जि.जळगाव : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जामनेर तालुक्यातून चिंचोली पिंप्री गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र गावाचे ग्रामस्थ व सरपंच यांनी १३ रोजी गावात ग्रामसभा घेऊन हे बक्षीस व पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला व आज १२ वाजता जवळपास ३०० ते ४०० ग्रामस्थ तहसील कार्यालयावर धडकले व तहसीलदार नामदेव टिळेकर यांना हा पुरस्कार परत केला व निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेत चिंचोली पिंप्री या गावाने सहभाग घेऊन संपूर्ण गावाने एकत्र येऊन जलसंधारणाची विविध कामे पूर्ण केलेली आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त काम करून चिंचोली पिंप्री या गावाची ओळख निर्माण केली आहे. या कामासाठी गावातील लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी अतोनात मेहनत करुन काम पूर्ण केले. त्यामध्ये गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पाणी फाउंडेशनमधील तज्ज्ञांच्या मते चिंंचोली पिंप्रीतील काम गुणवत्तापूर्वक असून, चिंंचोली पिंप्री हे गाव राज्यात प्रथम तीनमध्ये येण्यास पात्र आहे.
परंतु १२ आॅगस्ट रोजी बालेवाडी स्टेडियम पुणे येथे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेल्या प्रेझेन्टेशनमध्ये जे फुटेच दाखविण्यात आले आहे ते जवळपास ८० टक्के फुटेच चिंचोली पिंप्री येथील होते. परंतु आमच्या गावाचा पहिल्या तीनमध्ये नंबर आलेला नाही. त्यातूनच गावातील गावकऱ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. जर आमचे गाव पहिल्या तीनमध्ये येण्यास पात्र नव्हते तरआमच्या गावाचे ८० टक्के पुढेच का दाखविले. विजेते गावाचे फोटोज नव्हते का, असा प्रश्नचिन्ह गावातील ग्रामस्थांनी निर्माण झाला आहे. झालेल्या सर्व प्रकारानंतर संपूर्ण गावकऱ्यांमध्ये आपणास डावललेल्या गेल्याची भावना निर्माण झाली. म्हणून राज्यस्तरी पुरस्कारामध्ये डावललेल्या गेल्याची भावना निर्माण झाली असून आम्ही सर्व गावकºयांनी जामनेर तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी आमच्या सर्व गावकºयांच्या भावनांचा आदर राखून सदर पुरस्कार परत घेऊन पाणी फाउंडेशनला परत पाठवावा, असे तहसीलदारांना दिलेले निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर ५०० गावकºयांच्या स्वाक्षºया आहे.
दरम्यान, राज्यस्तरीय समिती गावात मूल्यमापन करण्यासाठी आली असता समितीचे पोपटराव पवार यांनी गावात केलेल्या कामाची धावती पाहणी केली, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

संबंधित गावकºयांशी चर्चा करून पुरस्कार परत न करण्याबाबत चर्चा करून विनंती केली. तथापि, त्यांचा पुरस्कार परत करण्याचा निर्णय अंतिम असल्याने पुरस्कार परत स्वीकारून पाणी फाउंडेशन कडे पाठवणार आहे.
-नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेर

हा निर्णय गावकºयांचा आहे आणि मी सरपंच या नात्याने त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहे.
-विनोद चौधरी, सरपंच, चिंचोली पिंप्री

ग्रामस्थ यांनी निवेदनात विचारलेले काही प्रश्न
१) एखादी परीक्षा दिल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका मिळते. त्यातून आपल्याला समजते की आपण कुठे चुकलो व त्यानुसार आपण भविष्यात त्यावर सुधारणा करतो. त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये आम्ही कुठे चुकलो कमी पडलो हे समजेल का?
२) जर चिंचोली पिंप्री गाव राज्यात प्रथम तीनमध्ये येण्यास पात्र नव्हते तर विजेते गावाचे सोडून आमच्या गावाचे फुटेज जवळपास ८० टक्के का दाखविण्यात आले. विजेत्या गावाचे फुटेज नव्हते का?
३) नाला जोड प्रकल्पातील डीप सीसीटीचा तांत्रिक मुद्दा विचारात घेऊन जर आमचा नंबर कापला गेला असेल तर मास्टर टेक्निकल ट्रेनर यांच्या सल्ल्यानुसारच हे काम केले होते त्याचे काय?
४) गावाची किंवा रंगरंगोटी यातून कुठलाही पाणी साठा निर्माण होत नाही मग या स्पर्धेमध्ये याला एवढे महत्व का दिले जाते?
५) विजेता निवडताना स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार का केला जात नाही.  

Web Title: Chincholi Pimpri villagers win back Jamnar Water Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.