चिंचोली ग्रा.पं. निवडणकीत हरकत फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:20+5:302021-01-02T04:13:20+5:30

जळगाव : चिंचोली ता. जळगाव येथील सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी संजय रामा वराडे यांनी प्रवीण जनार्दन धुमाळ ...

Chincholi G.P. Election objections rejected | चिंचोली ग्रा.पं. निवडणकीत हरकत फेटाळली

चिंचोली ग्रा.पं. निवडणकीत हरकत फेटाळली

Next

जळगाव : चिंचोली ता. जळगाव येथील सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी संजय रामा वराडे यांनी प्रवीण जनार्दन धुमाळ यांच्या विरोधात हरकत घेतली होती. धुमाळ हे ठेकेदार असून त्यांनी ग्रा.पं.च्या जागेवर अतिक्रमण केले असल्याचा दावा वराडे यांनी केला होता. मात्र ही हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.

धुमाळ यांच्या बाजूने वकील ॲड. विश्वासराव भोसले यांनी युक्तिवाद केला. धुमाळ हे आई तुळजाभवानी मजूर सहकारी संस्थेचे चेअरमनदेखील आहेत. मात्र संस्थेने घेतलेल्या कामाशी चेअरमन व संचालक यांचा प्रत्यक्ष हितसंबध नसतो. तसेच अतिक्रमणाची चौकशी करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांचा आहे. हे म्हणणे ग्राह्य धरून त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. तर वराडे यांची हरकत फेटाळण्यात आली. दरम्यान, वराडे यांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

Web Title: Chincholi G.P. Election objections rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.