आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादासाठी चीनचे पाकिस्तानला सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 18:45 IST2017-08-14T18:43:05+5:302017-08-14T18:45:04+5:30
जामनेर येथे स्वदेशी मंचचे दिल्ली येथील प्रचारक सतीशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादासाठी चीनचे पाकिस्तानला सहकार्य
ऑनलाईन लोकमत जामनेर (जि. जळगाव), दि. 14 : पाकिस्तानचा दहशतवाद पसरविण्यासाठी चीन आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांना प्रत्येक ठिकाणी सहकार्य करीत आहे. यासाठी नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे, अशी माहिती स्वदेशी जागरण मंचचे दिल्ली येथील प्रचारक सतीशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. चीनकडून भारतात 61.8 बिलीयन डॉलरची आयात होते. यामुळे आपल्या देशाला दरवर्षी 3542 अरब रुपयांचा तोटा होतो. याचा गांभीर्याने विचार करून चिनी मालावर सर्वानीच बहिष्कार टाकावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. बाबाजी राघो मंगल कार्यालयात झालेल्या या पत्रपरिषदेला राजीव क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौधरी, नीलेश गजरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.