महिलांना आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी मिरच मसाला स्वावलंबन योजना : नीलिमा मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:03+5:302021-08-20T04:21:03+5:30
आजही घरी असणाऱ्या महिलांनी चूल व मूल ही संकल्पना आहे. तिला आर्थिक बाबतीत कुटुंबातील कर्ता पुरुषावर अवलंबून असावे लागते. ...

महिलांना आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी मिरच मसाला स्वावलंबन योजना : नीलिमा मिश्रा
आजही घरी असणाऱ्या महिलांनी चूल व मूल ही संकल्पना आहे. तिला आर्थिक बाबतीत कुटुंबातील कर्ता पुरुषावर अवलंबून असावे लागते. मग तिला स्वतः स्वयंपाकघरातूनच आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी मिरची, मसाला, स्वावलंबन योजना तयार करण्यात आली आहे. यात महिलेला स्वयंपाक घरात मिरची, धने, हळद पावडर, मसाला या वस्तू दैनंदिन मोठ्या प्रमाणात लागतात. म्हणून तिने शुद्धतेची गॅरंटी असलेल्या बहिना ब्रॅण्डच्या वरील वस्तू खरेदी कराव्यात. खरेदी केलेल्या वस्तू बाजारभावापेक्षा कमी किमतीला असतील. घेतलेल्या वस्तूवर जो नफा असेल, त्या नफ्यातून या महिलेला तिच्या नावाचे शेअर्स मिळतील. वर्षभरात जेवढे शेअर्स खरेदीतून तिच्या नावावर जमा होतील, त्यावर तिला दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी लाभांश मिळेल, अशी माहिती नीलिमा मिश्रा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यात बहिना ब्रॅण्ड असलेल्या स्त्रीधन निधी बँकेच्या माध्यमातून हे सर्व मिरची, हळद, मसाला, धना पावडर, जिरे हे उत्पादन तयार करणार आहे. यासाठी कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून घेऊन त्यावर प्रक्रिया करून थेट महिलांना स्वयंपाकघरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १०० टक्के शुद्ध उत्पादन महिलांना बाजारभावापेक्षा कमी भावात उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बहादरपूर व नाशिक या दोन ठिकाणी स्त्रीधन निधी लिमिटेड बँकेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेकडून महिलांच्या मागणीप्रमाणे मालही घरपोच देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.