जळगावात लहानग्यांच्या कलाकृतींना दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 12:36 IST2017-07-03T12:36:13+5:302017-07-03T12:36:13+5:30

वर्धिष्णू सोशल रिसर्च सोसायटीतर्फे प्रदर्शन

Children's artworks in Jalgaon | जळगावात लहानग्यांच्या कलाकृतींना दाद

जळगावात लहानग्यांच्या कलाकृतींना दाद

 ऑनलाईन लोकमत

जळगाव ,दि.3 -  वर्धिष्णू सोशल रिसर्च व डेव्हलपमेंट सोसायटीच्या आनंदघर उपक्रमांतर्गत शहरातील  कचरावेचक,  बालमजुरीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मुला-मुलींना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रय} केला जातो. या उपक्रमातील मुलांनी तयार केलेल्या कलाकृती व शैक्षणिक वस्तूंचे प्रदर्शन रविवारी रोटरी भवनात लावण्यात आले. 
या प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष अॅड.सूरज चौधरी, सचिव कृष्णकुमार वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्याथ्र्यानी तयार केल्या टिकाऊ वस्तू
विद्याथ्र्यानी थर्माकोल व आइस्क्रीमच्या काडय़ांपासून आकर्षक घरे बनविली होती. कच:यात फेकून  देण्यात येणा:या पुठ्ठय़ापासून शैक्षणिक साहित्य मुलांनी तयार केले होते. तर काही विद्याथ्र्यानी आकर्षक चित्रे काढली होती. तर मुलांनी तयार केलेल्या लोकर  आर्टच्या कलाकृतींनी उपस्थित मान्यवरांची दाद मिळविली. विद्याथ्र्यासाठी दिवसभर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. या वेळी अद्वैत दंडवते, अनिता साळवे, भावना करंदीकर, महेश तिवारी उपस्थित होते. 

Web Title: Children's artworks in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.