बालके वंचित, कुपोषणाचेच 'पोषण'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:50+5:302021-09-24T04:18:50+5:30

जळगाव : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ऑगस्टच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे ...

Children deprived, malnutrition 'nutrition' | बालके वंचित, कुपोषणाचेच 'पोषण'

बालके वंचित, कुपोषणाचेच 'पोषण'

जळगाव : जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ऑगस्टच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे तीव्र कुपोषित बालकांची संख्या जुलैपर्यंतच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत तब्बल १२९१ ने वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात बालके वंचित राहतात आणि कुपोषणाचेच पोषण होत असल्याचे समोर येत आहे.

आसराबारी येथे बालकाचा मृत्यू झाल्यानंतर गंभीर स्वरूपात कुपोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शासकीय यंत्रणा यात कमी पडत असल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे. त्यातच दर महिन्याला वाढणाऱ्या आकड्यांवरून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण हे व्यवस्थित होत नसून, ते केवळ कागदावरच केले जात होते का? असाही एक प्रश्न समोर येत आहे. विविध सभा व बैठकांमध्ये हा प्रश्न गाजत असतानाच दुसरीकडे कारवाईस होणारा विलंब, नवीन कुपोषित बालकांसाठीच्या आहाराला होणारा विलंब या बाबी समोर येत आहे. महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागातील समन्वयाचा अभाव यामुळे चव्हाट्यावर आला आहे.

यावल तालुक्यात सहा पटींनी वाढ

यावल तालुक्यातील वड्रीजवळ असलेल्या आसराबारी या पाड्यावर कुपोषित बालकाचा मृत्यू झाल्यानंतर यंत्रणा जागी झाली. मात्र, याच यावल तालुक्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके असल्याचे ऑगस्टच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यात तीन सर्वेक्षणांत ही संख्या सहा पटींनी वाढली आहे. जुलैपर्यंत ३९, जुलैच्या सर्वेक्षणात १८३, तर ऑगस्टच्या सर्व्हेक्षणात २२२ तीव्र कुपोषित बालके समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे तालुक्यात ८१० बालके मध्यम कुपोषित आहेत. यावल तालुक्यात ही संख्या का वाढतेय याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक पाड्यांवर अद्यापही उपाययोजना पोहोचल्या नसल्याचे वास्तव आहे.

अशी आहे स्थिती

तीव्र कुपोषीत

जुलै : १३४६, ऑगस्ट : २६३७

मध्यम कुपोषित

ऑगस्ट : १०५३७ : जुलै : ६२०२

तालुक्यातील स्थिती

अमळनेर १५३

भडगाव १८८

भुसावळ ९२

बोदवड ८८

चोपडा : २४१

चाळीसगाव २८३

धरणगाव १३८

एरंडोल २१५

जळगाव १६१

जामनेर २३८

मुक्ताईनगर ९७

पाचोरा २१०

पारोळा १६७

रावेर १४४

यावल २२

Web Title: Children deprived, malnutrition 'nutrition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.