पाचोऱ्यात युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 21:46 IST2019-03-01T21:44:01+5:302019-03-01T21:46:02+5:30
पाचोरा शहरातील नागसेन नगर भागातील अविनाश सुरेश मोरे (वय २५) या युवकाने विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाचोऱ्यात युवकाची आत्महत्या
पाचोरा, जि.जळगाव : शहरातील नागसेन नगर भागातील अविनाश सुरेश मोरे (वय २५) या युवकाने विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली. २८ रोजी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली.
या युवकाने विद्युत खांबाला दोरी बांधून रात्रीच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना नागसेन नगर भागातील बुद्धविहाराच्या मागे आढळले. अविनाशचा मृतदेह विद्युत खांबाला लटकलेल्या अवस्थेत १ रोजी सकाळी आढळला. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
या युवकाचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यातही गळफास असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत अनिल मोरे याने पाचोरा पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.