किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : वाळू व्यावसायिकाच्या अवैध वाळूची अखेरची ट्रॉली भरल्यानंतर आपल्या चार वर्षाच्या बालकाला ट्रॉलीखाली निजवून तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या आदिवासी मजूर कामगाराच्या पश्चात अचानक दुसºया ट्रॅक्टर चालकाने 'ते' ट्रॅक्टर हाकून नेल्याने ट्रॉलीखाली निजलेल्या कोवळ्या बालकास चिरडल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी तीनला निंभोरासीम येथे घडली.निंभोरासीम येथील तापी नदी पात्राच्या काठावर वाळू उत्खनन, चाळणी व ट्रॅक्टर भराई करण्यासाठी मध्यप्रदेशातून काही पावरा आदिवासी कुटुुंबे वास्तव्यास आली आहेत. दरम्यान, मंगळवारी ऐनपूर येथील एका अवैध वाळू वाहतूकदाराच्या ट्रॅक्टरची अखेरची खेप भरल्यानंतर वाळू मजूर कामगारातील एक दाम्पत्य आपल्या चार वर्षाच्या विक्रम लालसिंग बारेला या बालकास ट्रॉलीखाली झुला करून अंघोळीसाठी निघून गेले. दरम्यान, हे ट्रॅक्टर दुसºया चालकाने येवून अचानक हाकून नेले. तेव्हा ट्रॉलीखालील झुल्यात निजलेल्यव चार वर्षाच्या बालकाच्या कमरेवरून चाक गेल्याने तो गंभीर अत्यावस्थेत चेंगरला गेला. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.त्यास गंभीर अवस्थेत रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याने नैसर्गिक विधी केल्याची चिंताजनक परिस्थिती पाहून त्यास जळगावला हलवण्याचा सल्ला दिला. किंबहुना, सावदा येथील खासगी रुग्णालयात नेत असताना त्याचा रस्त्यातच करूण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.दरम्यान, संबंधित अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टर मालकाने अवैध वाळू वाहतूकीचा मुद्दा चव्हाट्यावर येवू नये वा कायदेशीर गुन्ह्याच्या चौकटीत अडकण्यापेक्षा त्या मृत बालकाच्या आईवडिलांशी काही तडजोड केल्याची चर्चा आहे. संबंधित मृत बालकाच्या अकस्मात मृत्यू वा अपघातासंबंधी रावेर, निंभोरा वा सावदा पोलिसात कोणतीही नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.याबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तापी नदीपात्रात बोकाळलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीतून अनेकांचे निरपराध बळी जात असल्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने बालकास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 17:57 IST
ट्रॉलीखाली निजलेल्या कोवळ्या बालकास चिरडल्याची हृदयद्रावक घटना निंभोरासीम येथे घडली.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने बालकास चिरडले
ठळक मुद्देनिंभोरासीम येथील घटनावाळू मजूर कामगारांचा पोटचा गोळा झोपेतच गेला