जळगावात धाड पथकाला आढळला एक बालकामगार
By Admin | Updated: July 12, 2017 12:36 IST2017-07-12T12:36:49+5:302017-07-12T12:36:49+5:30
धाडसत्रात एका आस्थापनेवर बाल कामगार काम करीत असल्याचे आढळून आल्याची माहिती देण्यात आली.

जळगावात धाड पथकाला आढळला एक बालकामगार
आ नलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - बाल कामगार कृती दल समितीची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यात सरकारी कामगार अधिकारी यांनी राबविलेल्या धाडसत्रात एका आस्थापनेवर बाल कामगार काम करीत असल्याचे आढळून आल्याची माहिती देण्यात आली.यावेळी सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, पोलीस उप अधीक्षक रशीद तडवी यांचेसह सरकारी कामगार अधिकारी, महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकाºयांनी बाल कामगार कृती दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संयुक्त धाडपथकामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. शहरातील बाल कामगार शोधण्यासाठी जोमाने मोहिम राबविण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.