अपघातात बालक जागीच ठार
By Admin | Updated: September 26, 2015 00:38 IST2015-09-26T00:38:05+5:302015-09-26T00:38:05+5:30
कुसुंबा : पिकअप व्हॅन व दुचाकी यांच्या अपघातात रोहित संजय पाटील हा बालक जागीच ठार झाला.

अपघातात बालक जागीच ठार
कुसुंबा : येथील मालेगाव-दोंडाईचा रस्त्यावर पिकअप व्हॅन व दुचाकी यांच्या अपघातात रोहित संजय पाटील (वय 4 वर्षे) हा बालक जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. चौगाव, ता.धुळे येथील सुनील अशोक मासुळे (30), सचिन अशोक मासुळे (25) व त्यांचा भाचा रोहित पाटील (रा.सुट्रेपाडा) हे तिघे कुसुंबा येथे सकाळी बाजारासाठी आले होते. बाजार करून ते घराकडे परत जात होते. कुसुंब्यापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या अंकुर मूकबधिर विद्यालयाजवळ समोरून येणा:या पिकअप व्हॅन (एमएच 41-यू 1295)ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात रोहित पाटील हा जागीच ठार झाला, तर दोघे भाऊ गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये करण्यात आल. पिकअप व्हॅन मालेगाव तालुक्यातील खडकी येथील असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.