भुसावळ स्टेशनचे मुख्य तिकीट निरीक्षक व्ही.के.सचान यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 15:22 IST2020-10-07T15:21:28+5:302020-10-07T15:22:07+5:30

मुख्य तिकीट निरीक्षक व्ही.के.सचान यांचा वाणिज्य विभागातर्फे सन्मान करण्यात आला.

Chief ticket inspector of Bhusawal station VK Sachan was honored by the Commerce Department. | भुसावळ स्टेशनचे मुख्य तिकीट निरीक्षक व्ही.के.सचान यांचा सन्मान

भुसावळ स्टेशनचे मुख्य तिकीट निरीक्षक व्ही.के.सचान यांचा सन्मान

भुसावळ : भुसावळ स्टेशनचे मुख्य तिकीट निरीक्षक व्ही.के.सचान यांचा वाणिज्य विभागातर्फे सन्मान करण्यात आला.
मुख्य तिकीट निरीक्षक व्ही.के.सचान यांचे पुत्र अनिकेत सचान याची आयएएससाठी पहिल्या टप्प्यात निवड झाली. याबद्दल त्यांचा वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन करून वाणिज्य विभागातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टी.जा.) ए.के.पाठक, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (गुड्स) अनिल बागले उपस्थित होते.

Web Title: Chief ticket inspector of Bhusawal station VK Sachan was honored by the Commerce Department.