महावितरच्या मुख्य अभियंत्यांनी 16 वीज चोरांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:14 IST2017-07-29T13:10:49+5:302017-07-29T13:14:46+5:30
पाथरी येथे तपासणी करुन 16 वीजचोरांवर कारवाई

महावितरच्या मुख्य अभियंत्यांनी 16 वीज चोरांना पकडले
ठळक मुद्दे पाथरी येथे तपासणीगेल्या काही दिवसांपासून जोरदार कारवाई कारवाई सुरु असल्याने खळबळ
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - महावितरच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी शुक्रवारी स्वत: पाथरी येथे तपासणी करुन 16 वीजचोरांवर कारवाई केली. त्यांच्या सोबत कनिष्ठ अभियंता कुणाल महाजन तसेच कर्मचारी उपस्थित होत़े
पाथरी येथे चाँदखॉ मेहबुब खॉ, बन्सी पाथरवट, रवींद्र खरात, नाना धनगर, बाबू जाधव, उत्तम गायकवाड, देवचंद पाटील, रवींद्र जाधव, श्रीराम चौधरी, सुकलाल महाजन, नारायण पाटील, गोकूळ महाजन, सावकारी पाटील, छोटू पटेल, विठ्ठल जाधव, रंजनाबाई शिंदे या 16 जणांवर कारवाई करण्यात आली आह़े गेल्या काही दिवसांपासून जोरदार कारवाई सुरु असल्याने खळबळ उडाली आहे.