कोंबड्या.. मच्छर आणि बरंच काही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:02+5:302021-09-10T04:22:02+5:30
त्यांनी कोंबड्या फेकल्या आम्ही मच्छर मारण्यासाठी फवारणी केली... बदला घ्यावा तर असा... डेंग्यू हा मच्छरांपासून होतो. मच्छर स्वच्छ पाण्याच्या ...

कोंबड्या.. मच्छर आणि बरंच काही
त्यांनी कोंबड्या फेकल्या आम्ही मच्छर मारण्यासाठी फवारणी केली... बदला घ्यावा तर असा... डेंग्यू हा मच्छरांपासून होतो. मच्छर स्वच्छ पाण्याच्या डबक्यात आढळतात आता ही डबकी शासकीय कार्यालयात आहेत, की मेडिकल कॉलेजमध्ये याची मच्छरांना काय माहिती... जळगावची आंदोलने व त्याचे प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत... आंदोलनाच्या प्रकारावर आता कोण वरचढ हे ठरविले जात आहे. त्यांनी कोंबड्या फेकून हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यांनीही ‘हमभी है जोश मे’ म्हणत थेट सतरा मजलीत फवारणी केली... आंदोलन सुरू असताना एक गृहस्थ मात्र हसत दुसऱ्या गृहस्थांना.. ‘मच्छर यहासे निकला की नही निकला ये विषय नही... लेकीन फटू तो निकला’ असे बोलताना दिसले. डेंग्यू निवारणार्थ ज्या उपाययोजना राबवायला हव्या त्या राबविल्या जात नाही हे सत्य... जनजागृतीच्या पातळीवरही प्रशासन शून्यच.. दुसरीकडे लोकांच्या घरात अळ्या सापडल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा... याचे गांभीर्य टिकून राहिले पाहिजे... राजकारण कोंबड्यांपासून सुरू होऊन मच्छरांपर्यंत आले तरी चालेलं.. शेवटी महत्त्वाचे ‘सामन्यांचे भले... कोणता पक्ष कुठेही चाले’..असे म्हणत दोघे गृहस्थ मच्छरदाणीच्या किमती विचारत दुसऱ्या दुकानाकडे रवाना होतात... इकडे फोटो निघताच फवारणी आटोपलेली असते...