कारच्या प्रतिकृतीवर छंदवेडा ‘अभिषेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:06+5:302021-02-05T05:58:06+5:30

जळगाव : प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. मात्र, हा छंद वाचून थक्क व्हाल. जळगावच्या अभिषेक संतोषकुमार कौल यांना ...

Chhandveda 'Abhishek' on car replica | कारच्या प्रतिकृतीवर छंदवेडा ‘अभिषेक’

कारच्या प्रतिकृतीवर छंदवेडा ‘अभिषेक’

जळगाव : प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. मात्र, हा छंद वाचून थक्क व्हाल. जळगावच्या अभिषेक संतोषकुमार कौल यांना छंद आहे तो कारच्या मिनिएचर माॅडेल्स् , व्हिन्टेंज कार व दुचाकी जमविण्याचा. कारच्या जवळपास पाऊणे चार हजार प्रतिकृतीत अभिषेक यांचा जीव रमतोय. एवढंच नव्हे तर सन १९६२ पासून ते ८९ पर्यंत बाजारपेठेत आलेल्या नऊ स्कूटरसुध्दा त्यांच्या संग्रहात आहेत. दरम्यान, भविष्यात जळगावात मिनिएचर कार मॉडेल्सचे संग्रहालय उभारण्याचे मानस असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कार मॉडेलचे भारी वेड

वयाच्या तिसऱ्या वर्षी हातात कार मिळाली...आणि तेव्हापासून मिनिएचर कार मॉडेल्स् संग्रह करण्याचा अभिषेक यांचा छंद सुरू झाला. लहानपणापासूनच कार मॉडेलचे भारी वेड. खेळण्यापेक्षा तिला जपण्यातच अभिषेक हे धन्यता मानायचे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सुमारे पावणे चार हजार कारचे मॉडेल्स् जळगावातील बंगल्यात संग्रहित आहे. स्थापत्य अभियंता असलेले अभिषेक हे दर दोन वर्षांनी जर्मनी जातात. आणि संग्रहासाठी काही शोधत असतात.

स्कूटरसाठी देशभर भ्रमंती

पाच ते सहा वर्षात त्यांनी स्कूटरचा संग्रह केला़ यात वडिलांची बजाज चेतक स्कूटर सुध्दा जपून ठेवली. नंतर देशभर भ्रमंती करून सन १९६२ ते ८९ पर्यंत बाजारात आलेल्या बजाज स्कूटर त्यांनी शोधून संग्रहित केल्या. दर शनिवारी स्कूटर घराबाहेर काढून ते शहरातून फेरफटका मारत असल्याचे त्यांनी सांगितले. सन १९६२, १९६८, १९८१, १९८४, १९८७ व १९८९ सालातील स्कूटर त्यांच्याकडे आहेत. त्यात व्हेस्पा एक्सई, बजाज सुपर, बजाज प्रिया, बजाज चेतक, बजाज १५० आदी स्कूटरचा समावेश आहे. तसेच दोन लुनासुद्धा आहेत.

संग्रहात या कार देखील...

मिनिएचर कार मॉडेल्स, स्कूटरसह पाच व्हिन्टेज श्रेणीतील कार सुध्दा अभिषेक यांच्याकडे आहे. स्कूटरप्रमाणे त्या कार सुध्दा आठवड्यातून ते चालवितात. त्यांच्याकडे मॉरिस मायनर (सन १९४९), फियाट एलिगेट (१९५६), फियाट सुपर सिलेक्ट (१९६२), फियाट ११०० (१९६७), मारुती सुझुकी ८०० (१९८५) या कार आहेत. या छंदासाठी त्यांना वडील ॲड.एस.के.कौल तसेच आइ व पत्नीची सुध्दा साथ मिळत आहे.

Web Title: Chhandveda 'Abhishek' on car replica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.