जळगावात केमिस्ट असोसिएशन व भाजपा केमिस्ट महासंघ पदाधिका:यांमध्ये खडाजंगी
By Admin | Updated: May 23, 2017 15:44 IST2017-05-23T15:16:57+5:302017-05-23T15:44:08+5:30
जगन्नाथ शिंदे भाजपा केमिस्ट महासंघावर भडकले : महासंघाचे पदाधिकारी व शिंदे, भंगाळे यांच्यात जोरदार खडाजंगी

जळगावात केमिस्ट असोसिएशन व भाजपा केमिस्ट महासंघ पदाधिका:यांमध्ये खडाजंगी
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.23- ज्या सभासदांना महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशन लि. या कंपनीचे शेअर्सचे पैसे परत हवे असतील ते सरळ तक्रार करतील. आमच्याकडे येऊन यादी देतील. पण तुम्ही (भाजपा केमिस्ट महासंघ) इतर सभासदांची दलाली करू नका.. असा संताप महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मंगळवारी भाजपा केमिस्ट महासंघाच्या पदाधिका:यांशी चर्चा करताना केला. या वेळी दीपक जोशी व जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यातही जोरदार खडाजंगी झाली.
मंगळवारी जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा केमिस्ट भवन येथे सकाळी 10.30 वाजता आयोजिण्यात आली. ही सभा जगन्नाथ शिंदे सभासस्थळी आल्यानंतर लागलीच म्हणजेच 11.50 वाजता गुंडाळली. यानंतर महिला फार्मसिस्टचा सत्कार झाला.
भाजपा केमिस्ट महासंघाचे केमिस्ट भवनसमोर लाक्षणिक उपोषण
असोसिएशनची वार्षिक सभा केमिस्ट भवनात सुरू होती, बाहेर भाजपा केमिस्ट महासंघातर्फे या भवनासमोर लाक्षणिक उपोषण सुरू होते. त्यात महासंघाचे प्रदेशाध्यक्ष किशोर भंडारी, शाकीर चित्तालवाला, दीपक जोशी, निशिकांत मंडोरा, डॉ.सतीश अगीवाल, प्रभाकर कोल्हे, संजय नारखेडे, कनकमल राका, नगरसेवक सुनील माळी आदी सहभागी झाले. दुपारी जगन्नाथ शिंदे हे या उपोषणकत्र्याची भेट घेण्यास आले. या वेळी शिंदे व उपोषणकत्र्यामध्ये वाद झाला. जगन्नाथ शिंदे म्हणाले की, ही कंपनी खाजगी नाही ही राज्य केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशनची कंपनी आहे. तिचा नफा 1 कोटी 32 लाख झाला आहे. उगीच खोटय़ा बातम्या देऊ नका. तक्रारी असतील.. तथ्य असले तर पोलिसात जा असा सल्ला त्यांनी दिला.