चक्क आरटीओ अधिकाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:51+5:302021-09-18T04:18:51+5:30

भुसावळ : सर्वसाधारणपणे सर्वसामान्यांची फसवणूक होत असते. वाहन परवाना काढताना आरटीओ अधिकाऱ्यांचीच फसवणूक केल्याचा प्रकार पुन्हा उघड झाला ...

Cheating chucky RTO officer | चक्क आरटीओ अधिकाऱ्याची फसवणूक

चक्क आरटीओ अधिकाऱ्याची फसवणूक

भुसावळ : सर्वसाधारणपणे सर्वसामान्यांची फसवणूक होत असते. वाहन परवाना काढताना आरटीओ अधिकाऱ्यांचीच फसवणूक केल्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे. याप्रकरणी भुसावळच्या तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास ब्रिजलाल छाबडा, जी. डी. व अन्य एक अज्ञात यांनी वाहन परवाना काढताना अर्जावर डमी उमेदवाराचा फोटो लावला आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करून परवाना तयार करून घेतला. ही बाब उपप्रादेशिक परिवहन विभागाने २९ ऑक्टोबर २०२० रोजी केलेल्या कार्यालय अभिलेखाच्या तपासणीदरम्यान उघड झाली.

दरम्यान, छाबडा याला जळगाव उपप्रादेशिक कार्यालयात हजेरी लावण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते. कोरोना झाल्याचे कारण देत त्याने टाळाटाळ केली. यामुळे कार्यालयाची फसवणूक केल्याने मोटार वाहन निरीक्षक सचिन प्रमोद सानप (३४, मकरंद कॉलनी, महाबळ, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार वरील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मोहम्मद वली सैय्यद तपास करीत आहेत.

Web Title: Cheating chucky RTO officer