चाळीसगावला डॉक्टरला मारहाण

By Admin | Updated: July 2, 2017 03:37 IST2017-07-02T03:37:11+5:302017-07-02T03:37:11+5:30

न्यू बालाजी हॉस्पिटलचे डॉ. राहुल पाटील यांना नगरसेवक शेख चिरागोद्दीन यांच्यासह दोघांनी मारहाण करत ठार मारण्याची शुक्रवारी

Chattisgarh doctors doctor | चाळीसगावला डॉक्टरला मारहाण

चाळीसगावला डॉक्टरला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव (जि. जळगाव) : न्यू बालाजी हॉस्पिटलचे डॉ. राहुल पाटील यांना नगरसेवक शेख चिरागोद्दीन यांच्यासह दोघांनी मारहाण करत ठार मारण्याची शुक्रवारी धमकी दिली. डॉक्टर दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडला.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शहरातील दोन गटांत हाणामारी झाली होती. त्यातील गंभीर जखमी मुन्ना शहा यास राहुल पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथून त्यास धुळे येथे पाठविल्यावर त्याचा मृत्यू झाला होता.
मुन्ना शहा याच्यावर उपचार न करता त्याला मृतावस्थेतच धुळे येथे हलविण्यात आले होते, असे शेख चिरागोद्दीन व हैदर अली यांचे म्हणणे होते. त्यानंतर डॉ. पाटील यांच्याशी त्यांचा वाद झाला होता.

Web Title: Chattisgarh doctors doctor