शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

चणकापूर, पुनंद धरणाला चकवा देतेय वृष्टी, ‘गिरणा’ म्हणते, पाण्याने भर देवा माफी सृष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 19:01 IST

९ दिवसांपासून गिरणेच्या पातळीत अत्यल्प वाढ : नांदगाव, त्र्यंबक, सटाणा भागात पावसाअभावी अडचण

कुंदन पाटील

जळगाव : गिरणा धरणाच्या वरच्या भागात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात ९० टक्क्यांवर जलसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र दि.१६ सप्टेंबरपासून नाशिकच्या पाच प्रकल्पाच्या भागात पाऊस पडत नसल्याने ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा विसर्ग वाढत नसल्याने गिरणा धरणातील जलसाठ्याची पातळी उंचावत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नांदगाव (नाशिक) तालुक्यात असलेल्या गिरणा धरणामुळे जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यासाठी प्रचंड लाभदायी आहे.चाळीसगाव व नांदगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या या धरणाचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्याला होतो. मात्र यंदा या धरणाची पातळी गेल्या आठ दिवसांपासून अत्यल्प प्रमाणात वाढताना दिसत आहे. सर्वदूर पाऊस होत असताना गिरणाची पातळी का उंचावत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मात्र गिरणा धरणाच्या जलपातळी उंचावण्यासाठी पूरक ठरणाऱ्या नांदगाव, सटाणा,मालेगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस नाही. त्यामुळे चणकापूर , पुनंद, ठेंगोडा बंधारा, हरणबारी व नाग्यासाक्या धरणातून ओंसाडून वाहणारा जलसाठा गिरणा धरणात येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

ठेंगोडा बंधारा महत्त्वाचा

चणकापूर धरणात सध्या ९५.९३ टक्के जलसाठा आहे. तर पुनंदमध्ये ९६.७६, हरणबारीत व नाग्यासाक्या धरणात १०० टक्के जलसाठा आहे. चणकापूर आणि पुनंदमधील जलसाठा १०० टक्के झाल्यानंतर ओसांडून वाहणारे पाणी ठेंगोडा बंधाऱ्यात येते. हा बंधारा ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्यातील पाणी गिरणा धरणात येते.

मात्र गेल्या १६ सप्टेंबरपासून नांदगाव, सटाणा, वणी,  त्र्यंबकेश्वर, मालेगाव भागात जोरदार पाऊस नाही. नाशिकसह अन्य तालुक्यात पाऊस आहे. तो पाऊस मात्र गिरणासाठी लाभदायी नाही. परिमाणी चणकापूर व पुनंद धरण ओंसाडून वाहून निघत नसल्याने ठेंगोडा बंधारा कोरडाठाक पडला आहे. या दोन्ही धरणातून ओव्हरफ्लो झालेल्या पाणयामुळे ठेंगोडा बंधारा भरुन निघाल्यानंतरच गिरणा धरणातील जलसाठ्यात प्रभावी वाढ होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.जलस्त्रोत असलेल्या भागात गेल्या १० दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात प्रभावीपणे वाढ झालेली नाही.

-वजय जाधव, उपविभागीय अभियंता, गिरणा पाटबंधारे.

धरणनिहाय जलसाठ्याची टक्केवारी 

हतनूर-७४.९०वाघूर-९३.५७गिरणा-५५.३८अभोरा-१००मंगरुळ-१००सुकी-१००मोर-९५.५८अग्नावती-०९.२८हिवरा-२३.७९बहुळा-५०.८५तोंडापूर-१००अंजनी-८२.७४गूळ-८०.६६भोकरबारी-२१.७६बोरी-२८.३२मन्याड-००